राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपले अनुभव आणि आठवणी खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवादातून शेअर केल्या. भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.
खेळाडूंच्या यशामुळे देशातील लाखो युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत