सावदा स्वामीनारायण मंदिरात श्रावणानिमित्त हनुमान चालीसा कथेचे आयोजन
सावदा स्वामीनारायण मंदिरात श्रावणानिमित्त हनुमान चालीसा कथेचे आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा : श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ पासून दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत हनुमान चालीसा या ग्रंथावर आधारित कथावाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कथेचे निरूपण शास्त्री स्वामी भक्तीप्रिय दासजी करणार आहेत. दररोज एक तास होणाऱ्या या कथेतून भाविकांना हनुमान चालीसेचे आध्यात्मिक महत्त्व आणि भक्तिमार्गाचा संदेश जाणून घेता येणार आहे. परिसरातील सर्व भाविकांनी या कथेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी स्वामी स्वयंप्रकाश दासजी यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात आकर्षक हिंदोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज भजन व आरतीने हा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत असून, सुंदर सजविलेल्या हिंदोळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदोळा महोत्सव म्हणजे भगवानांच्या झुला-पाळणा सेवेचा उत्सव असून, यानिमित्त मंदिरातील हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांचे दर्शन घेऊन भक्तांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे मंदिर ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
मंदिरात कोठारी स्वामी स्वयंप्रकाश दासजी यांच्यासमवेत माधव स्वामी आणि पुजारी स्वामी सत्यप्रकाश दासजी सेवा बजावत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत