निधन वार्ता वामनराव कृष्णाजी पाटील विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिलीप निळकंठ चौधरी यांचे निधन
निधन वार्ता
वामनराव कृष्णाजी पाटील विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिलीप निळकंठ चौधरी यांचे निधन
आमोदा (वार्ताहर): रावेर तालुक्यातील मस्कावद बुद्रुक येथील रहिवासी तसेच वामनराव कृष्णाजी पाटील विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळ, मस्कावदचे विद्यमान चेअरमन दिलीप निळकंठ चौधरी (वय ६३) यांचे बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मस्कावद बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे मस्कावद परिसरासह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, शैक्षणिक परिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते चेतन चौधरी यांचे वडील होत. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत