डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्टी रॅगिंग सप्ताहात जनजागृती
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्टी रॅगिंग सप्ताहात जनजागृती
जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे १२ ते १८ ऑगस्टदरम्यान अॅन्टी रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी सप्ताहात विविध उपक्रम घेण्यात आले.
या अंतर्गत कार्यशाळा, शॉर्ट फिल्म, जनजागृतीपर रॅली, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य सादरीकरण आणि निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून रॅगिंगचे दुष्परिणाम तसेच रॅगिंगविरोधी कायदे आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.
महाविद्यालयातर्फे आयोजित जनजागृतीपर रॅलीत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. माया आर्विकर, सुरेंद्र गावंडे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅगिंगमुक्त आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रॅगिंगला विरोध करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत