Contact Banner

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

 

kuntankhanavar-police-raid-four-women-rescued-bhusawal-aklood

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

प्रतिनिधी फैजपूर -





फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली. तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह एका संशयिताविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, फैजपूर, यावल पोलिस ठाणे आणि निंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी प्रथम एका पंटरला संबंधित ठिकाणी पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिस पथकाने दुमजली घरावर छापा टाकला.

पोलिसांनी घराची पाहणी केली असता त्यामध्ये अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे आढळून आले. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चार महिलांची सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला मूळच्या कोलकाता, पश्चिम बंगाल येथील असून सध्या त्या परिसरात स्थायिक आहेत. तर एक महिला भुसावळ येथील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित महिलांची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर प्रकरणातील इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.

डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या नियोजनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अकलूद परिसरातील सुरू असलेल्या या प्रकाराचा पर्दाफाश झाला असून पोलिसांच्या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.