डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन
डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, जळगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम तसेच मैदानी स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रो. वैजयंती असोदेकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विद्यार्थिनींमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेला वाव मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयात विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १०० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, शटल रन यांसह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थिनींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
यावेळी प्रा. चंद्रकांत डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत डोंगरे तसेच क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व सुरेख सूत्रसंचालन प्रो. शिवानी महाजन यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत