Contact Banner

गोदावरी आयएमआरमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन

 

godavari-imr-national-sports-day-celebration-jalgaon




गोदावरी आयएमआरमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (GIMR), जळगाव येथे भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांसह मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. चेतन सरोदे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेला वाव मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयात विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये १०० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप आणि शटल रन यांसारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्पर्धांचा आनंद लुटला. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी प्रा. चंद्रकांत डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत डोंगरे व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व सुरेख सूत्रसंचालन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.