Contact Banner

एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या टाकरखेडा येथे दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल

 

four-members-of-same-family-die-by-suicide-under-train-at-takarkheda

एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

टाकरखेडा येथे दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल






लेवाजगत न्यूज अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे पती-पत्नीने आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुनील अमृत भिल, पार्वती सुनील भिल, त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज या चौघांचा मृत्यू झाला.

एकाला ताब्यात घेतले

या प्रकरणी सीताराम उर्फ गटलू ताणकू भिल याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आत्महत्येमागे अनैतिक संबंधाचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याच आशयाची फिर्याद दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजता हे चौघे घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रेल्वे मार्ग गाठून धावत्या रेल्वेखाली झोकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

पहाटे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती अमळनेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.