Contact Banner

खान्देश एक्स्प्रेसखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

 

khandesh-expresskhal-i-tarunachi-atmahatya-chopda-narwade-dnyaneshwar-dhangar

खान्देश एक्स्प्रेसखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

चोपडा तालुक्यातील नरवाडे येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट






लेवाजगत न्यूज चोपडा : तालुक्यातील नरवाडे येथील ज्ञानेश्वर कैलास धनगर (३०) या तरुणाने खान्देश एक्स्प्रेसखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

चोपडा रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपोच्या शेजारी रेल्वे रुळावर हा प्रकार घडला. खान्देश एक्स्प्रेस येत असताना ज्ञानेश्वर धनगर यांनी रेल्वेखाली झोकून देत जीवन संपविले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर धनगर यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.