गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्गांची दुरुस्ती करा नगरसेविका सिमरन वानखेडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्गांची दुरुस्ती करा
नगरसेविका सिमरन वानखेडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
लेवाजगत न्यूज सावदा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरातील गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गांची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळ्यामुळे तसेच यापूर्वीपासूनच शहरातील विविध रस्त्यांची अवस्था खराब असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिक व गणेशभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी संबंधित मार्गांची विशेष दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा मोठा उत्सव असल्याने पालिकेने आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. विशेषतः गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शहरातील सर्व भागांत नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि आवश्यक ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात यावी. उत्सव सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत