Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

 

godavari-college-engineering-national-fdp-generative-ai-quantum-computing-concludes

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

जळगाव | प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित "जनरेटिव्ह एआय अँड क्वांटम कॉम्प्युटिंग" या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) नुकताच यशस्वीरीत्या पार पडला.






डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी या एफडीपीमध्ये सहभाग घेत आधुनिक तंत्रज्ञानातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथील प्रा. प्रमोद बिडे यांनी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलतत्त्वे, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तसेच विविध क्षेत्रांतील जनरेटिव्ह एआयच्या उपयोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील डॉ. प्रीती पाटील यांनी शिक्षण, उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या उपयोगांवर प्रकाश टाकला.

दुसऱ्या दिवशी एल. आर. तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मीरा रोडचे प्राचार्य डॉ. उमेश भदादे यांनी मल्टीमोडल एआय, रॅग (RAG) आर्किटेक्चर आणि अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाची माहिती दिली. न्युटॅनिक्स प्रा. लि.चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी मयूर पाटील यांनी एआय एजंट्स, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या व्यावहारिक उपयोगांवर मार्गदर्शन केले.

तिसऱ्या दिवशी क्वांटम कॉम्प्युटिंग विषयावरील विशेष सत्रात प्रा. प्रमोद बिडे यांनी क्यूबिट्स, सुपरपोझिशन, एन्टँगलमेंट, क्वांटम गेट्स आणि पारंपरिक संगणनाच्या तुलनेत क्वांटम संगणनाचे फायदे स्पष्ट केले. तर एनएमआयएमएस, मुंबई येथील प्रा. भावना बोस यांनी क्वांटम कॉम्प्युटिंगमधील गणितीय संकल्पना, संशोधनातील प्रगती आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

चौथ्या दिवशी प्रा. भावना बोस यांनी ग्रोव्हरचा शोध अल्गोरिदम, शोरचा अल्गोरिदम, क्वांटम क्लाउड कॉम्प्युटिंग, क्वांटम सायबर सुरक्षा आणि क्वांटम प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म्स यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विवेचन केले.

अंतिम दिवशी "जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग : नवकल्पना, संशोधनाच्या संधी आणि भविष्यातील दिशा" या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. डॉ. विजय ए. कोतकर यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधन, नवउद्योजकता, उद्योग-अभ्यासक सहकार्य आणि करिअरच्या नव्या संधी यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजक प्रा. निलेश एस. वाणी, सहसंयोजक प्रा. प्रशांत शिंपी आणि समन्वयक डॉ. निलेश वाय. चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. प्रा. शिरीन पिंजारी यांनी आभार प्रदर्शन केले.

एफडीपीच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी संगणक अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन करून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.