हिंदी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
हिंदी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लेवाजगत फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील हिंदी विभागातील एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील सर्व विषय यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनी काजल जीवन चौधरी तसेच विद्यार्थी एजाज तडवी, समीर तडवी आणि सोहेल तडवी यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते नोटबुक्स देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी हिंदी विभागप्रमुख प्रो. कल्पना पाटील, प्रो. ईश्वर ठाकूर, प्रो. विजय सोनजे आणि प्रा. डॉ. सतीश पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य तसेच उपस्थित प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत