Contact Banner

जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरू; माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची सुवर्णसंधी

 

jt-mahajan-college-of-engineering-btech-admissions-open-quality-engineering-education-at-affordable-fees

जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरू; माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची सुवर्णसंधी

सावदा (ता.रावेर ) | लेवाजगत न्यूज : अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेल्या जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फैजपूर तालुका यावल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष बी.टेक. तसेच थेट द्वितीय वर्ष बी.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि अत्यंत माफक शुल्कात अभियांत्रिकी शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.






सन १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रवेश फेरी क्रमांक-१ अंतर्गत महाविद्यालय पसंती अर्ज भरण्याची प्रक्रिया ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडणार असून ४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ५ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान प्रवेश निश्चित करून संबंधित संस्थेत हजेरी लावणे आवश्यक राहणार आहे.

महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी या शाखांमध्ये प्रत्येकी ६० जागा, तर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ३० जागांची प्रवेश क्षमता आहे.

विशेष म्हणजे प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, अत्यंत वाजवी शुल्कात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास, प्रात्यक्षिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर दिला जातो. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम अभियंते घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९६३७०७१२९१, ९३२५१८८९८२ आणि ९३७३२७४२०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

"उज्ज्वल भविष्य घडवूया... चला, अभियांत्रिकीच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया!" असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.