Contact Banner

CAP Round-IV प्रवेशाला सुरुवात; जे.टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी

 

jt-mahajan-polytechnic-faizpur-cap-round-4-diploma-admission-2026

CAP Round-IV प्रवेशाला सुरुवात; जे.टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी

फैजपूर | लेवा जगत प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जे.टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या CAP Round-IV प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चित मुदतीत अर्ज करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.






प्रथम वर्ष डिप्लोमासाठी अर्ज ३ ते ८ ऑगस्ट २०२६, तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ५ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. राज्य शासनाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

संस्थेत सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी या शाखांमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, स्वतंत्र वसतिगृह, अनुभवी शिक्षकवर्ग आणि सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकाल ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व शुल्क सवलत योजनांचाही लाभ मिळणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्कमाफी मिळणार आहे. तसेच EWS, EBC आणि SEBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठीही शासनाच्या नियमानुसार विविध शैक्षणिक लाभ उपलब्ध राहतील.

करिअरला तांत्रिक शिक्षणाची मजबूत दिशा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्रशासनाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.