Contact Banner

खवशी तलावातील गाळात अडकून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी तलावात घेतली उडी; गाळात अडकल्याने दोघांचाही मृत्यू

 

khavshi-talav-gal-ataklyane-pita-putracha-mrutyu

खवशी तलावातील गाळात अडकून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी तलावात घेतली उडी; गाळात अडकल्याने दोघांचाही मृत्यू







लेवाजगत न्यूज अमळनेर : तलावात उतरलेल्या सात वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली; मात्र तलावातील गाळात दोघेही अडकल्याने पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास खवशी (ता. अमळनेर) येथे घडली.

अण्णा एकनाथ तलवारे (३२) आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र ऊर्फ वीरू अण्णा तलवारे (७) अशी मृतांची नावे आहेत. अण्णा तलवारे हे मूळचे आर्वी (ता. धुळे) येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या सासरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वीरू तलावाजवळ खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक तलावाच्या पाण्यात उतरला. मुलगा पाण्यात गेल्याचे लक्षात येताच वडील अण्णा तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तातडीने तलावात उडी घेतली.

मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने वीरू आणि त्याचे वडील अण्णा दोघेही गाळात अडकले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे खवशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.