नागपूर-मडगाव गणेशोत्सव विशेष ट्रेनला भुसावळला थांबा २२ सप्टेंबरपर्यंत दर बुधवारी धावणार; खान्देशातील भाविकांची सोय
नागपूर-मडगाव गणेशोत्सव विशेष ट्रेनला भुसावळला थांबा
२२ सप्टेंबरपर्यंत दर बुधवारी धावणार; खान्देशातील भाविकांची सोय
प्रतिनिधी | भुसावळ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर ते मडगावदरम्यान विशेष ट्रेनच्या सहा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला भुसावळ येथे थांबा देण्यात आल्याने खान्देशातून कोकणात जाणाऱ्या भाविक व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
गाडी क्र. ०११३९ नागपूर-मडगाव विशेष १९ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी रात्री ११.४५ वाजता नागपूरहून सुटेल. परतीची गाडी क्र. ०११४० मडगाव-नागपूर विशेष १८ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान दर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मडगावहून सुटेल.
या विशेष गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत.
१९ डब्यांची गाडी
या विशेष ट्रेनमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी-३), शयनयान (स्लीपर) आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून एकूण १९ डबे असणार आहेत.
‘रेलवन’ अॅपवर आरक्षणाची सुविधा
प्रवाशांना या विशेष गाडीचे आरक्षण ‘रेलवन’ अॅपद्वारे करता येणार आहे. गाडीची अचूक वेळ, उपलब्धता आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत