डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद जयंती उत्साहात साजरी
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद जयंती उत्साहात साजरी
लेवाजगत न्यूज सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी धनंजय ठाकूर याने केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची तसेच क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व स्पष्ट करून त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमितपणे क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर शाळेतील खेळाडूंसाठी हॉकी व फुटबॉल या दोन खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा सामन्यांचे पर्यवेक्षण क्रीडा शिक्षक वसीम शहा व असलम अली यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅक्टिव्हिटी कोच तुषार सैतवाल, रिमशा मल्लिक, अकील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाविषयक कार्याची प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा संकल्प केला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
#राष्ट्रीयक्रीडादिन #मेजरध्यानचंद #मेजरध्यानचंदजयंती #डॉउल्हासपाटीलस्कूल #सावदा #हॉकी #फुटबॉल #क्रीडादिन #क्रीडाउपक्रम #विद्यार्थी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत