श्री. रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा; ३० ऑगस्टला मुक्ताईनगर व भुसावळमध्ये विविध कार्यक्रम
श्री. रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा; ३० ऑगस्टला मुक्ताईनगर व भुसावळमध्ये विविध कार्यक्रम
लेवाजगत न्यूज जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले हे ३० ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या राजशिष्टाचार कक्षाकडून त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
श्री. आठवले हे २९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून रवाना होऊन ३० ऑगस्ट रोजी पहाटे ४.४८ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होतील. त्यानंतर ते अजिंठा शासकीय अतिथीगृह, जळगाव येथे विश्रांतीसाठी थांबणार आहेत.
सकाळी ११ वाजता ते मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई मंदिरात उपस्थित राहणार आहेत. येथे अमृतमहोत्सव सोहळा व ज्येष्ठ लोकनेते श्री. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव सत्कार समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.
यानंतर दुपारी १ वाजता श्री. आठवले यांचा भुसावळ येथील वरंगोवा रोडवरील हॉटेल राधाकृष्ण येथे संक्षिप्त थांबा असेल. दुपारी १.३० वाजता येथे त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत भुसावळ येथे थांबल्यानंतर ते सायंकाळी ४.३० वाजता रस्तामार्गे पुढील प्रवासासाठी रवाना होतील. रात्री ८.३० वाजता संभाजीनगर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.
दरम्यान, राज्यमंत्री आठवले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत, निवास, वातानुकूलित वाहन तसेच सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांना महाराष्ट्रात ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
या दौऱ्यात त्यांचे वैयक्तिक कर्मचारी श्री. हेमंत शंकर रणपिसे हे त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत