मानवी मूल्यांची उंची गाठणारे डॉ. मधुसूदन घाणेकर
मानवी मूल्यांची उंची गाठणारे डॉ. मधुसूदन घाणेकर
पुणे : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय एकपात्री जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘सबकुछ मधुसूदन’ या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाचा १९ ऑगस्ट २०२६ रोजी ८५,००० वा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी डॉ. घाणेकर यांना मानपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “जिथे रसिक, तिथे कार्यक्रम” अशी व्यासपीठाची नवी व्याख्याच त्यांनी निर्माण केली आहे. १९६३ पासून भारतासह २० देशांत त्यांनी ८४,९९९ प्रयोग केले असून, दिव्यांग आणि वंचितांसाठी ५० हजारांहून अधिक विनामूल्य प्रयोग सादर केले आहेत. विविध क्षेत्रांत त्यांनी ३०९ विश्वविक्रम नोंदविले आहेत. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातील माणूसपण अधिक श्रेष्ठ आहे.”
मानपत्राचे शब्दांकन करून त्याचे वाचन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
या प्रसंगी डॉ. मधुसूदन घाणेकर संपादित ‘डहाळी’ या विश्वविक्रमी अनियतकालिकाचा १,१६५ वा विशेषांक तसेच प्रिया दामले लिखित ‘सबकुछ मधुसूदन या एकपात्री कार्यक्रमाचा ८५,००० वा प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला रंगकर्मी व नाट्यलेखक सुहास वाळुंजकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या बालसचिव एम. अजया, मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष मेघना मधुसूदन घाणेकर, वसुधा इंटरनॅशनलच्या संस्थापक-अध्यक्ष वसुधा नाईक, डॉ. राजेंद्र भवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीला विद्वांस, मधुकर्णिका फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, कवयित्री शैलजा सोमण, दीपाराणी गोसावी, कवीराज विजय सातपुते, विनोद अष्टुळ, नंदकिशोर गावडे, प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख, गौरव पुंडे, प्रमोद कुलकर्णी, भालचंद्र शिर्के, शीला इंदापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले. प्रिया दामले यांनी प्रास्ताविक करून अतिथींचे स्वागत केले. यावेळी ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मासिक कवी संमेलनाचीही घोषणा करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत