Contact Banner

स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या तरुण उद्योजिकेच्या कर्तृत्वाचा गौरव- यशस्वी उद्योजक गुणगौरव सोहळ्यात कु. साक्षी अजय भारंबे यांचा सन्मान

 

successful-entrepreneur-award-sakshi-ajay-bharambe-pune

यशस्वी उद्योजक गुणगौरव सोहळ्यात कु. साक्षी अजय भारंबे यांचा सन्मान

स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या तरुण उद्योजिकेच्या कर्तृत्वाचा गौरव



successful-entrepreneur-award-sakshi-ajay-bharambe-pune


लेवाजगत न्यूज पुणे : लेवापाटीदार उत्कर्ष मंडळ, पुणे परिसर यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशस्वी उद्योजकांच्या ‘यशस्वी उद्योजक गुणगौरव सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तरुण उद्योजिका कु. साक्षी अजय भारंबे, संचालक – इव्हेंचर्स इव्हेंट्स तसेच प्रोप्रा. – उमारा इंटेरिअर यांचा त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

कु. साक्षी भारंबे यांनी अल्पावधीतच आपल्या मेहनत, कल्पकता, नियोजनकौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर इव्हेंचर्स इव्हेंट्सच्या माध्यमातून इव्हेंट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच उमारा इंटेरिअरच्या माध्यमातून इंटेरिअर क्षेत्रातही त्या उल्लेखनीय कार्य करीत आहेत. स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारण्यासोबतच इतरांना रोजगार व कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

समाजातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारावा, उद्योजक बनावे आणि इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, या उद्देशाने मंडळाच्या वतीने अशा कर्तृत्ववान उद्योजकांचा गौरव करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होत असून, आत्मनिर्भरतेचा संदेशही समाजापर्यंत पोहोचत आहे.

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष जयंत राणे, कार्याध्यक्ष भूषण भंगाळे, सचिव दिलीप पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कर्तृत्वाचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.