Contact Banner

दहावी-बारावीच्या फॉर्म क्र. १७ ची ऑनलाइन नोंदणी सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत संधी

 

MSBSHSE Form 17 (English)

दहावी-बारावीच्या फॉर्म क्र. १७ ची ऑनलाइन नोंदणी सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत संधी

प्रतिनिधी | जळगाव

पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी खासगीरीत्या (फॉर्म क्र. १७) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसून, नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत मुख्य परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक राहील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.





आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा मूळ दाखला (किंवा दुय्यम प्रत व प्रतिज्ञापत्र)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आवश्यक ओळखपत्रे (स्कॅन करून अपलोड करणे)
  • अर्जाची प्रिंट, शुल्क भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे
  • दिव्यांग विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
  • मुक्त विद्यालय मंडळातून पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थीही दहावीच्या फॉर्म क्र. १७ साठी पात्र असतील.

नावनोंदणीचे वेळापत्रक

  • नियमित शुल्कासह: १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
  • ₹१०० विलंब शुल्कासह: १ ते १५ ऑक्टोबर २०२६
  • अतिविलंब शुल्क (दररोज ₹२० अतिरिक्त): १६ ते ३१ ऑक्टोबर २०२६

विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.