मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
जळगाव | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील कार्यक्रमाची प्रगती लक्षात घेऊन मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राद्वारे सुधारित कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहतील. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
प्रारूप मतदार याद्या २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.
यानंतर अंतिम मतदार याद्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत