Contact Banner

पंकजा मुंडे यांचा ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर जळगाव जिल्हा दौरा

 

pankaja-munde-jalgaon-district-tour-august-30-2026

पंकजा मुंडे यांचा ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर जळगाव जिल्हा दौरा

लेवाजगत न्यूज जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर येथे आयोजित लोकनेते एकनाथभाऊ खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास त्या उपस्थित राहणार आहेत.

मंत्री मुंडे सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहातून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता त्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर येथे पोहोचून अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहतील.

यानंतर दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर येथून त्या शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४.३० वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचा काही काळ राखीव कार्यक्रम असेल. सायंकाळी ५.२५ वाजता त्या FLY91 विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

मंत्री मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दौरा कार्यक्रमानुसार त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.