Contact Banner

गांधी चौक येथील माजी नगरसेवक वसंत गणपत येवले यांचे निधन

 

savda-former-corporator-vasant-ganpat-yevale-passes-away

गांधी चौक येथील माजी नगरसेवक वसंत गणपत येवले यांचे निधन

लेवाजगत न्यूज सावदा, दि. २९ ऑगस्ट : गांधी चौक येथील रहिवासी तथा सावदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. वसंत गणपत येवले यांचे आज, शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी पहाटे १.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सावदा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. वसंत येवले हे सावदा बसस्थानकासमोरील ‘शीतल कार कूल’चे संचालक अतुल येवले व प्रवीण येवले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, दोन सुना, एक जावई व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज, शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गांधी चौक येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि येवले कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕊️




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.