Contact Banner

मलकापूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा यात्रा

 

raver-lok-sabha-malkapur-har-ghar-tiranga-tiranga-yatra-raksha-khadse-chain-sukh-sancheti

मलकापूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा यात्रा

 रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर येथे देशभक्तीचा जल्लोष; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार चैनसुख संचेती यांची प्रमुख उपस्थिती

लेवाजगत न्यूज मलकापूर : रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत मलकापूर येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य ‘तिरंगा यात्रा’ मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या जल्लोषात पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या यात्रेत राष्ट्रभक्तीचा जोश आणि तिरंग्याप्रतीचा अभिमान अनुभवायला मिळाला.





शहीद संजयसिंग राजपूत स्मारक येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला. ही यात्रा हुतात्मा स्मारक, तहसील चौक येथे पोहोचून उत्साहात संपन्न झाली.

यावेळी तिरंग्याचा अभिमान, देशासाठी समर्पित भावना आणि राष्ट्रभक्तीचा उत्साह नागरिकांमध्ये प्रकर्षाने दिसून आला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण यात्रेदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी मलकापूरचा परिसर भारावून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.