सावदा शहरात ई-पिक पाहणी सुरू; शेतकऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन
सावदा शहरात ई-पिक पाहणी सुरू; शेतकऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावदा शहरातील शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणी व पीक-पाणी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः ई-पिक पाहणी करण्याची आवश्यकता नसून, संबंधित गट क्रमांकानुसार नियुक्त केलेल्या प्रतिनिधी/कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ई-पिक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी रशीद तडवी यांनी केले आहे.
सावदा शहरातील शेतकऱ्यांनी आपल्या गट क्रमांकानुसार खालील संबंधित प्रतिनिधी/कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
गट क्रमांक १ ते १२४३
प्रतिनिधी : पिंटू तडवी
मोबाईल : ८८०६५९५९१६
गट क्रमांक १२४३ ते १९५६
प्रतिनिधी : सुरेश बोरनारे
मोबाईल : ९९२११८३१९३
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित गट क्रमांकानुसार दिलेल्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, तसेच या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी रशीद तडवी यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत