Contact Banner

श्री गणेश वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद चोपडे यांचे निधन

 

sharad-vasudev-chopade-passes-away-nhavi-shri-ganesh-librar

श्री गणेश वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद चोपडे यांचे निधन


sharad-vasudev-chopade-passes-away-nhavi-shri-ganesh-librar


लेवाजगत न्यूज न्हावी : येथील श्री गणेश वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद वासुदेव चोपडे (वय ६२) यांचे शनिवारी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा रविवार सकाळी नऊ वाजता राहते घरून निघेल.त्यांच्या निधनाने न्हावी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाचनालय तसेच सत्संग परिवाराने एक निष्ठावान सेवाभावी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.ते आकाश चोपडे यांचे वडील होत.

शरद चोपडे हे भगवान श्री स्वामीनारायण यांचे अनन्य निष्ठावान भक्त होते. स्वामीनारायण सत्संगाशी त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. संतांविषयी त्यांच्या मनात नितांत आदर आणि प्रेम होते. सत्संग, संतसेवा आणि धार्मिक कार्यांमध्ये ते नेहमी उत्साहाने सहभागी होत असत.

त्यांच्या निधनाने सत्संग परिवाराची मोठी हानी झाली असून, सत्संगाला त्यांच्या रूपाने मोठी उणीव भासणार आहे. त्यांचे प्रेमळ, शांत आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी भावना नातेवाईक, मित्रपरिवार व सत्संग परिवारातून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.