विश्व हिंदू परिषदेचे भुसावळ जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तायडे यांचे अपघाती निधन
विश्व हिंदू परिषदेचे भुसावळ जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तायडे यांचे अपघाती निधन
लेवाजगत न्यूज खिरोदा, ता. रावेर : विश्व हिंदू परिषदेचे भुसावळ जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश तायडे यांचे आज दुपारी १२ वाजता झालेल्या अपघातात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विश्व हिंदू परिषद परिवारावर शोककळा पसरली आहे.
प्रशांत तायडे हे सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकस्मात निधनाने समाजाने एक कार्यतत्पर व्यक्ती गमावली आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६ वाजता खिरोदा, ता. रावेर येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
ॐ शांती 🙏




कोणत्याही टिप्पण्या नाहीत