Contact Banner

मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

ycmou-admission-process-extended-till-31-august-2026-two-degrees-at-the-same-time

मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नियमित पदवीसोबत आणखी एका पदवीला प्रवेशाची संधी; दोन पदव्यांना एकाच वेळी प्रवेश घेता येणार






प्रतिनिधी | नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विनाविलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवी अभ्यासक्रमासोबत दूरशिक्षणाच्या माध्यमातून आणखी एका पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील दोन पदवी अभ्यासक्रमांनाही एकाच वेळी प्रवेश घेता येणार आहे.

ही सुविधा बी.एड. आणि विशेष बी.एड. शिक्षणक्रमांना लागू नसून, विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार यंदा विद्यापीठात पारंपरिक शिक्षणक्रमांसोबत विविध नवीन व व्यावसायिक शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.