Contact Banner

सावदा शहरात किटकनाशक फवारणी तातडीने करा; शिवसेनेची नगरपरिषदेकडे मागणी




सावदा शहरात किटकनाशक फवारणी तातडीने करा; शिवसेनेची नगरपरिषदेकडे मागणी

लेवाजगत न्यूज सावदा : सावदा शहरात डास व इतर किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता शहरात तातडीने किटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने सावदा नगरपरिषदेकडे करण्यात आली.

याबाबत शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते यांच्या नेतृत्वाखाली दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या अनुपस्थितीत प्रशासन अधिकारी प्रमोद चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.






निवेदनात सावदा शहरात डास व इतर किटकांचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांत हातपंपाद्वारे किटकनाशक फवारणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

फवारणी न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते, माजी नगरसेवक धनंजय उर्फ लाला चौधरी, सचिव शरद भारंबे, सहसंघटक दिगंबर महाजन, मिलिंद पाटील तसेच शिवसैनिक सुनील राणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.