‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला
मुलींच्या वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला.
या मंगलमय सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. यावेळी मा. डॉ. वैभव पाटील, मा. डॉ. प्रशांत सोळंके, मा. डॉ. प्रेमचंद पंडित, प्रमोद भिरूड, अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील तसेच उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात पुरोहित संदीप का. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत मंत्रोच्चारात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करून करण्यात आली. कर्मचारी गणेश नांदुरकर यांनी सपत्नीक धार्मिक विधी पार पाडला. त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली.
वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला. गणेशमूर्तीच्या स्थापनेमुळे वसतिगृहातील वातावरणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सर्वांच्या सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत