Contact Banner

अंतर्नादची दशकभराची सामाजिक बांधिलकी; ‘एक दुर्वा समर्पण’तर्फे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणेश चतुर्थीनिमित्त सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांच्या व मुलींच्या शाळेत सामाजिक उपक्रम

 

antarnad-ek-durva-samarpan-113-students-educational-material-sangvi

अंतर्नादची दशकभराची सामाजिक बांधिलकी; ‘एक दुर्वा समर्पण’तर्फे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

गणेश चतुर्थीनिमित्त सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांच्या व मुलींच्या शाळेत सामाजिक उपक्रम

भुसावळ | प्रतिनिधी-

गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा आदर्श अंतर्नाद प्रतिष्ठानने गेल्या दशकभरापासून जपला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक दुर्वा समर्पण’ या सामाजिक उपक्रमाला यंदा दहा वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांची व मुलींची शाळेतील एकूण ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला सामाजिक कार्याची दिशा मिळावी आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे.

यंदा सांगवी येथील दोन्ही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, पट्टी, रंगपेटी, खोडरबर तसेच बालमित्र पुस्तक आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. गणेश स्थापनेच्या दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवासारखे सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. उत्सवातील खर्चाचा काही भाग समाजातील गरजू घटकांसाठी वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे म्हणजे त्यांच्या शिक्षणाला आणि भविष्यातील वाटचालीला हातभार लावणे होय, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

‘एक दुर्वा समर्पण’च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जात आहे. सण-उत्सवाच्या आनंदासोबत सामाजिक संवेदनशीलता जपण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात असून, समाजातील अधिकाधिक व्यक्तींनी अशा उपक्रमांना सहकार्य करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास भालोद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे, श्री कृष्ण कन्स्ट्रक्शनचे संचालक स्वप्निल जावळे, अतुल फिरके, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत मेघे, केंद्रप्रमुख एम. एच. तडवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी निकिताताई कोळी व मुस्तफा तडवी, अध्यक्ष जयश्री तायडे, युनिसेफचे सुबोध तायडे, भूषण धांडे, जयंत बोरोले, उल्हास वायकोळे, शरद तायडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी केले. त्यांनी ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमामागील भूमिका आणि गेल्या दहा वर्षांच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. प्रकल्प सह-समन्वयक ललित महाजन यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकल्प समन्वयक उमेश फिरके यांनी आभार मानले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, जीवन महाजन, मुख्याध्यापिका सुवर्णा कवितके, अतुल चौधरी, शिक्षिका चारूलता बऱ्हाटे, सलिमा तडवी, कपिल धांडे, केतन महाजन, विपीन वारके, योगेश साळुंके, शर्वरी पाटील, सहर्ष पाटील तसेच अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची ही परंपरा पुढे नेत ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने दशकपूर्तीचा टप्पा गाठला असून, आगामी काळातही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा संकल्प कायम ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.