Contact Banner

सावदा येथे कुंभारवाड्यातील एकता गणेश मंडळाची उत्साहात स्थापना शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली; उपजिल्हाप्रमुख रविंद्र पवार यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना


 

kumbharwadyatil-ekta-ganesh-mandalachi-utsahat-sthapana

कुंभारवाड्यातील एकता गणेश मंडळाची उत्साहात स्थापना

शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली; उपजिल्हाप्रमुख रविंद्र पवार यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

लेवाजगत न्यूज सावदा :  : गणेश चतुर्थीनिमित्त सावदा शहरातील कुंभारवाडा परिसरातील एकता गणेश मंडळाची श्री गणरायाची विधिवत स्थापना सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना सोहळा पार पडला. उपजिल्हाप्रमुख रविंद्र पवार सर यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी सावदा शहरप्रमुख भरत नेहते, भूषण वसंत महाजन, शाम भामरे (रावेर), नितीन महाजन, वसंत महाजन आणि आकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणरायाच्या स्थापना सोहळ्यानिमित्त कुंभारवाडा परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पूजा, आरती व धार्मिक विधी पार पडल्यानंतर उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्री गणरायाचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत गणरायाचे दर्शन घेतले.

या प्रसंगी सावदा शहरातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना सैनिक तसेच एकता गणेश मंडळाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे स्थापना सोहळ्याची तयारी करून कार्यक्रम यशस्वी केला.

गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नसून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर एकता गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

श्री गणरायाच्या आगमनाने कुंभारवाडा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी विविध उपक्रमांसाठी मंडळाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. स्थापना सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.