Contact Banner

भ्रातृमंडळ अकोलाची वार्षिक आमसभा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात

 

bhratrimandal-akola-annual-general-meeting-meritorious-students-felicitation-2026

भ्रातृमंडळ अकोलाची वार्षिक आमसभा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात


bhratrimandal-akola-annual-general-meeting-meritorious-students-felicitation-2026
जाहिरात करिता संपर्क साधा-8983689844

bhratrimandal-akola-annual-general-meeting-meritorious-students-felicitation-2026
जाहिरात करिता संपर्क -लेवाजगत न्यूज 8983689844


लेवाजगत न्यूज अकोला : भ्रातृमंडळ अकोला या समाजसेवी मंडळाची वार्षिक आमसभा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी प्रभा लेआउट, शास्त्रीनगर येथील मंडळाच्या इमारतीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मूर्ती तसेच भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. राजीव इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ. प्रमोद हरी महाजन उपस्थित होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सोमाभाऊ खर्चे, कोषाध्यक्ष प्रवीण वराडे, सचिव श्रीकृष्ण नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या स्वागतानंतर मागील वर्षभरात दिवंगत झालेल्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर एकूण १६ गुणवंत व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, सन २०२५-२६ चा वार्षिक जमाखर्च अहवाल तसेच सन २०२६-२७ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले. उपस्थित सभासदांनी त्यास मंजुरी दिली. सर्व कार्यवाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

प्रमुख पाहुणे डॉ. प्रमोद हरी महाजन यांनी उपस्थितांना समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव महेंद्रकुमार चौधरी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. अवंतिका खर्चे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. सभेनंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.