भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम
लेवाजगत न्यूज भुसावळ : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त भुसावळ येथील आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या कार्डिओ-रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे हे शिबिर घेण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. यावेळी हृदय व श्वसन फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ. अमित जैस्वाल, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रियांका घुमनानी, निवासी डॉक्टर डॉ. सुदेश वायदंडे, डॉ. पूजा गुरुदासानी तसेच त्यांच्या टीमने सहभाग घेतला.
शिबिरामध्ये एकूण ३० पोलीस अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वायएमसीए ३ मिनिट स्टेप टेस्ट घेण्यात आली. या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्डिओ-रेस्पिरेटरी फिटनेसचे परीक्षण करण्यात आले.
शिबिराचे संपूर्ण व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेने केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत