Contact Banner

चाळीसगावात बैलाच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत बाहेर पोळ्याच्या नैवेद्यासोबत गिळली सोन्याची पोत; १० दिवसांनी तीन तासांच्या शस्त्रक्रियेत काढली, बैलाला जीवनदान

 

chalisgaon-bull-swallows-three-tola-gold-necklace-surgery

चाळीसगावात बैलाच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत बाहेर

पोळ्याच्या नैवेद्यासोबत गिळली सोन्याची पोत; १० दिवसांनी तीन तासांच्या शस्त्रक्रियेत काढली, बैलाला जीवनदान

लेवाजगत न्यूज चाळीसगाव-



chalisgaon-bull-swallows-three-tola-gold-necklace-surgery
लेवाजगत मार्फत जाहिरात प्रसिद्धी 


मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी वनाजी बोरसे यांच्या बैलाने पोळ्याच्या सणाला नैवेद्यासोबत तब्बल तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळली. सुमारे ४ लाख ७१ हजार रुपये किमतीचे सोने बैलाच्या पोटात गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. बैलजोडीपैकी नेमक्या कोणत्या बैलाने पोत गिळली, हेही सुरुवातीला स्पष्ट होत नव्हते.

चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आधुनिक तपासणी तंत्रज्ञानाच्या मदतीने अखेर हा गुंता सोडवण्यात आला. तपासणीत सोन्याची पोत बैलाच्या पोटातील ‘रेटिक्युलम’ या कप्प्यात अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तब्बल तीन तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सोन्याची पोत व तिचे विखुरलेले मणी सुरक्षितपणे बाहेर काढले. या शस्त्रक्रियेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे सोने वाचण्यासोबतच बैलालाही जीवनदान मिळाले.

‘रेटिक्युलम’मध्ये अडकले होते सोने

गाय-बैलांसारख्या रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पोटाचे चार कप्पे असतात. त्यापैकी ‘रेटिक्युलम’ हा मधाच्या पोळ्यासारख्या रचनेचा कप्पा आहे. अन्नासोबत चुकून गिळलेले धातूचे पदार्थ या कप्प्यात अडकू शकतात. त्यामुळे पोटाला इजा होऊन संसर्ग, वेदना आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

सोन्यासोबत पोटातून निघाला ‘कचरा’ही

तीन तासांच्या शस्त्रक्रियेत सोन्याची पोत आणि तिचे विखुरलेले मणी बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, बैलाच्या पोटातून दोन चामड्याचे गोळे, नायलॉनची वायर तसेच एक आणि दोन रुपयांची नाणीही आढळून आली. त्यामुळे बैलाने यापूर्वीही विविध वस्तू गिळल्याचे स्पष्ट झाले.

वेळेवर करण्यात आलेली अचूक तपासणी आणि शस्त्रक्रियेमुळे बैलाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला जीवनदान मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.