Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनावर पोस्टर प्रदर्शन

 

dhanaji-nana-mahavidyalaya-faizpur-environment-conservation-poster-exhibition

धनाजी नाना महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनावर पोस्टर प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी २३ पोस्टर्समधून मांडला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लेवाजगत न्यूज फैजपूर : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘आपला निसर्ग, आपली जबाबदारी : शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल’ या विषयावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. झेड. सुरवाडे आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील उपस्थित होत्या. पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षण कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.

यावेळी सातपुडा विकास मंडळ, पालचे अध्यक्ष श्री. अशोक भारंबे, सचिव श्री. अजितदादा पाटील, तसेच जनता शिक्षण मंडळ, खिरोदा येथील सहसचिव श्री. सुधाकर झोपे आणि कृषी विज्ञान केंद्र, पालचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. महेश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रदर्शनाला विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, जैवविविधता संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि शाश्वत विकास अशा विविध विषयांवर एकूण २३ आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेसोबतच पर्यावरणाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी प्रभावीपणे मांडली.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्वावस्ती तायडे यांनी केले, तर आभार श्वेता भालेराव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. सरला तडवी, प्रा. शिवाजी मगर, प्रा. मंदार बामनोदकर, आर. आर. जोगी आणि विकास वाघुळदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी तसेच पर्यावरणीय जाणीव निर्माण करणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.