जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. २ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा प्रकरणांतील संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे.
तसेच, वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी आपली तक्रार मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत