Contact Banner

यावल शहरातील ६.५ कि.मी. मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

 

yaval-city-main-road-concrete-work-bhumi-pujan-6-5-km-14-59-crore

यावल शहरातील ६.५ कि.मी. मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

लेवाजगत न्यूज यावल : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावल शहरातील कि.मी. १७४.१०० ते १८०.६०० या दरम्यानच्या एकूण ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहे.






बायपासमुळे शहरातील विद्यमान रस्त्यांच्या विकासासंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी तसेच नागरिकांची दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातून यावल शहरातील या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

या कामामुळे यावल शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शहराच्या विकासाला, दळणवळणाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.