Contact Banner

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलचे घवघवीत यश

 

doktor-ulhas-patil-school-savda-taluka-level-chess-competition-success

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलचे घवघवीत यश



doktor-ulhas-patil-school-savda-taluka-level-chess-competition-success


लेवाजगत सावदा : रावेर येथे आयोजित आंतरशालेय १४ व १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात यशस संदिप पाटील (इयत्ता आठवी) आणि आशुतोष शंकर तिवारी (इयत्ता नववी) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळासाठी क्रीडा शिक्षक वसीम शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक प्रशांत सोनवणेअसलम अली यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे डॉ. उल्हास पाटील स्कूल, सावदा यांच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.