Contact Banner

पोषण सप्ताह उत्साहात; विद्यार्थ्यांनी दिला संतुलित आहाराचा संदेश

 

dr-ketaki-patil-college-of-nursing-nutrition-week-celebration-jalgaon

पोषण सप्ताह उत्साहात; विद्यार्थ्यांनी दिला संतुलित आहाराचा संदेश






जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘पोषण सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावर्षीच्या पोषण सप्ताहाची संकल्पना ‘पोषणाची शक्ती जाणून घ्या’ अशी होती. विद्यार्थ्यांमध्ये पोषणाचे महत्त्व, संतुलित आहार, आरोग्यदायी जीवनशैली तसेच पोषणविषयक जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

पोषण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोषण, संतुलित आहार, कुपोषण प्रतिबंध आणि आरोग्यदायी आहार या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या तसेच माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. प्रिती गायकवाड, प्रा. अस्मिता जुमडे, प्रा. सुमित भारंबे, प्रा. श्रुती गोरोले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पोषण जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य परिचर्या विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.