Contact Banner

डॉ.राजेंद्र वाघुळदे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; प्राचार्य संवर्गातून सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड

dr-rajendra-waghulde-adarsh-teacher-award-best-principal-2024-25-faizpur






डॉ.राजेंद्र वाघुळदे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; प्राचार्य संवर्गातून सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड

लेवाजगत फैजपूर : तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भास्कर वाघुळदे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन २०२४-२५ साठी प्राचार्य संवर्गातून सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.




डॉ. वाघुळदे यांनी प्राचार्य म्हणून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. शैक्षणिक, सामाजिक तसेच संस्थात्मक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.




त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मिळताच तापी परिसर विद्यामंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




प्राचार्य संवर्गातून सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून मिळालेला हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची, कार्यक्षम प्रशासनाची आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती मानली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.