Contact Banner

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

 

dr-ulhas-patil-english-medium-school-hindi-day-celebration-savda

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

लेवाजगत न्यूज सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साह व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी पलक पाटील व कुमारी याशिका गुडवे यांनी केले. यावेळी इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी तसेच हिंदी शिक्षिका सौ. माधुरी डोळे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील तिची उपयुक्तता याविषयी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे व कविता वाचनातून हिंदी भाषेविषयी आपले प्रेम व आदर व्यक्त केला.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात हिंदी सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात हिंदी विषयावरील मनोरंजक खेळ, आशुभाषण, दोहा गायन यांसह विविध रंजक व ज्ञानवर्धक उपक्रम घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड व प्रेम निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या समन्वयक श्रीमती अर्चना इंगले, श्रीमती मीनल पाटील, श्रीमती दीपाली धांडे, श्रीमती ज्योती रावते यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयीचा अभिमान, आदर आणि आत्मीयता अधिक दृढ झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.