Contact Banner

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन!

 

dr-varsha-patil-womens-college-godavari-campus-raja-ganeshotsav-jalgaon

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन!

लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’च्या भव्य आगमन सोहळ्यासह श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या शुभहस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत पूजा-अर्चा व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कल्पकतेने भव्य आणि आकर्षक सजावट केली आहे. या नयनरम्य सजावटीमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत गोदावरी फाउंडेशन आणि प्रस्तुत रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट (रोटरी क्लब ऑफ जळगाव एलाईट) यांच्या वतीने ‘सहयोग निधी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गणेशमूर्ती विक्रीतून प्राप्त होणारा निधी अनाथ मुलांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

विद्यार्थिनींची आकर्षक सजावट तसेच सामाजिक उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.