Contact Banner

डॉ.उल्हास पाटील कृषी परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता बैलपोळा सण उत्साहात; परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम

 

डॉ.उल्हास पाटील कृषी परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

बैलपोळा सण उत्साहात; परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम

लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बैलपोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्जा-राजाची विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून त्यांची आरती करण्यात आली. उपस्थितांनी शेतकऱ्याचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांमुळे कृषी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच त्यांची कृषी संस्कृतीशी नाळ जोडली जावी, या उद्देशाने महाविद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम साधत साजरा झालेल्या या बैलपोळ्याला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, संचालक सतीश सावके, डॉ. मिलिंद तायडे, प्रा. सुशील चव्हाण, परिचारिका अधीक्षक मनीषा खरात, प्रा. कीर्ती पाटील, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्रशासन अधिकारी चेतन चौधरी, देवेंद्र भंगाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.