Contact Banner

खांदा कॉलनीत पारंपरिक मंगळागौर उत्साहात साजरी

 

खांदा कॉलनीत पारंपरिक मंगळागौर उत्साहात साजरी

उरण : सुनील ठाकूर-

“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणी नमोऽस्तुते॥”

लग्नानंतर श्रावण महिन्यातील मंगळवारी नववधू आपल्या अखंड सौभाग्य व वैवाहिक सुखासाठी मंगळागौरीचे व्रत करते. मात्र मंगळागौर हा केवळ धार्मिक व्रत-वैकल्याचा सोहळा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, पारंपरिक खेळ, लोकगीत आणि स्त्रीशक्तीचा आनंददायी संगम मानला जातो.

याच परंपरेचा जागर करत खांदा कॉलनीतील साई सिमरन सोसायटीमध्ये सौ. नेत्राली नारायण ठाकूर यांनी आपल्या सूनबाई सौ. निशा पराग ठाकूर यांच्यासाठी मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला. ८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी पारंपरिक मंगळागौरीची गाणी, नृत्य, विविध खेळ तसेच हास्य-विनोदाने भरलेले उखाणे यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. महिलांनी जुन्या पारंपरिक खेळांच्या व आठवणींच्या माध्यमातून आनंद लुटला.

या सोहळ्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच महिलांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद घेत ‘बाईपण भारी’ असल्याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.