डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा येथे गणपती बाप्पांना उत्साहात निरोप घोडागाडी, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात पर्यावरणपूरक विसर्जन
डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा येथे गणपती बाप्पांना उत्साहात निरोप
घोडागाडी, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात पर्यावरणपूरक विसर्जन
सावदा | प्रतिनिधी :
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याला उत्साह, भक्तिभाव आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली. शाळेच्या परिसरात गणपती बाप्पांची घोडागाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक लेझीम सादर करत मिरवणुकीची शोभा वाढवली.
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी नृत्य करत बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देत शाळेच्या आवारात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली. याच कृत्रिम तलावात गणपती बाप्पांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सण-उत्सव पर्यावरणाची काळजी घेत साजरे करण्याचा संदेश देण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साह, भक्तिभाव, पारंपरिक संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील गणपती विसर्जन सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत