Contact Banner

सावदा येथे विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती! गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

environment-friendly-ganpati-making-workshop-at-dr-ulhas-patil-english-medium-school-savda


सावदा येथे विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती! गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लेवाजगत न्यूज सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक गणपती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. कला शिक्षक उमेश बढे यांनी विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीपासून गणपतीची सुंदर प्रतिमा साकारून मूर्ती निर्मितीची प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली.

यावेळी कला शिक्षक खिलेश राणा, कांचन महाजन व लक्ष्मी महाजन यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.