Contact Banner

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर जळगाव जिल्ह्यातील ७,३१६ शेतकऱ्यांचा समावेश

 

punyashlok-ahilyadevi-holkar-farmer-loan-waiver-scheme-second-list-7316-farmers-jalgaon

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

जळगाव जिल्ह्यातील ७,३१६ शेतकऱ्यांचा समावेश

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ११ सप्टेंबर  : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. आता ११ सप्टेंबर २०२६ रोजी योजनेची दुसरी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५,३९९ शेतकऱ्यांचा, तर इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या १,९१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ७,३१६ शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत पात्र ठरले आहेत.

यापुढेही या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या याद्या संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

#शेतकरी #कर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना #जळगाव #Maharashtra #LewaJagat #लेवाजगत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.