Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

 

godavari-engineering-college-teachers-day-celebration

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या शिक्षक दिनाची ‘टीचर्स क्रिएट मॅजिक’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गात ज्ञानदान करण्याचा अनोखा अनुभव घेतला.


godavari-engineering-college-teachers-day-celebration


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकवर्ग यांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह प्राचार्य, अधिष्ठाता तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या भूमिकाही पार पाडल्या. शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, आव्हाने आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील शिक्षकांचे योगदान याची जाणीव झाली.

दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षक-विद्यार्थी नाते आणि शिक्षकांचे जीवनातील योगदान यावर मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. “शिस्त, कौशल्य आणि परिवर्तनातूनच उज्ज्वल भविष्य घडते. बदलत्या काळानुसार परिवर्तन स्वीकारून जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत,” असे त्यांनी सांगितले. ‘टीचर्स क्रिएट मॅजिक’ संकल्पनेतून सक्षमीकरण आणि शाश्वत भविष्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख, फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स, स्टुडंट कौन्सिल, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

#शिक्षकदिन #गोदावरीअभियांत्रिकीमहाविद्यालय #जळगाव #TeachersDay #TeachersCreateMagic #शिक्षक #विद्यार्थी #गोदावरीफाउंडेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.